होळी
होळी
दररोजच जळतात मने यातनां मधी
सततच पेटलेला आहे क्लेषाग्नी !
द्यावीच लागते आहे आहुती आकांक्षांची
कुठेना कुठे आहेच शिमगा आक्रोशाचा
खचुन पडलीय येथे राख स्वप्नांची
मस्त सारे खेळती धुळवड सत्तेची
कायमच नाडला जातोय सामान्यजन
भ्रष्टाचार, स्वैराचार रंगतोय खादीवर
मर मर राबणारा नेमाने खचतोय
ओरबाडणारा तसाच माजतोय
असा रोजच शिमगा होतोय
मग नव्याने होळी ती काय पेटवायची ?
बस झाल अती होतय
अंत पहीला सोसण्याचा
मिळून सारे सरळ सज्जन
उतरुन टकायाची लाचारी
झुगारुन सारी गुलामी
प्रत्यक मनातील एक एक ठिणगी
आहुती द्यायाची पुंडांची दुराचाराची
शिमगा एकदाच दुर्जनांचा लबाडांचा
पेटवू मशाल एकीची जनशक्तीची
आता होळी क्रांतीची ! आता होळी क्रांतीची !
दररोजच मरतात ईथे झाडे, वने
फोफवतात सिमेंटची निर्जीव जंगले
आटते नदी-नाले, विहीरी
ओसरेना पूर अश्रूंचा कधी
नदी उरली कुठे किती राहीली
तुम्ही आम्ही वळवली सारी गटारे
जिथे तिथे घाण कचरा करूनी
प्रदुषणाचे मांडले नवे उच्चांक
अशी नित्य होते निसर्गाची होळी
मग नव्याने ती काय पेटवायची ?
बस झाल अती होतय
अंत पाहू नये सृष्टीचा
मिळून सारे मानव प्राणी
नेसवू हिरवाई भूमाईस
उधळूया रंग फुलांचे
खणू शोष खड्डे, जिरवू सांडपाणी
कचरा प्रदुषणाची आहुती देवूनी
शिमगा यंदा सफाई-स्वच्छतेचा
कर्तव्य सेवा ज्योती हाती
आता ज्ञान-विज्ञान होळी !
आता पर्यावरण होळी !
