STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

संरक्षण मंत्री...!

संरक्षण मंत्री...!

1 min
371


घेण्यासारखं काहीतरी....!


घेण्यासाठी जन्म आपला

हाच आपण जन्म जपला

जाईल तिथे मग पाडून ढपला

स्वार्थ सदा आपला साधला....!


नखे काढतो नित्य आपण

स्वच्छतेच्या नावा खाली

पण खरे सांगायचे तर

त्यात स्वार्थाची पेरणी होती झाली...!


नखातली माती सुद्धा

सोडवत नाही आपल्या कडून

इतुके कृपण आणि

खरे पाहातल स्वार्थी आपण....


पण


घेण्या सारखे आदर्श

कित्येकांनी जपले देण्यासाठी

तेच पुरतील जन्मभर आपल्याला

खरे आनंदी जीवन जगण्यासाठी...


चला मग नवी सुरुवात करू

चांगलल्याची आता कास धरू

निस्वार्थी प्रेमळ जीवन जगुनी

एक नवा इतिहास घडवू....


जुने झाले गेले गंगेला मिळाले

नवं विचाराने गंगा स्नान झाले

वाहतात पहा प्रमाणिकतेचे वारे

आता एकत्रित पणे प्रामाणिक व्हा रे...


घ्यायचेच असेल तर संस्कार घ्या रे

कळू देत जगाला सत्य सारे

ढपला पाडून स्वार्थाचा

निस्वार्थाची संस्कार पुंजी वाढवू रे...


उजळ माथ्याने जगुया जीवन

संस्कारांचे करून पूजन

आदर्श घोटाळा एकदा जीवनात करू

आणि संस्काराठी जिंकू किंव्हा मरू...


मला वाटते इतुकाच स्वार्थ साधावा

एक नवा अध्याय जाणुन घ्यावा

घेण्या सारखे चांगले बरेच आहे

घेऊन स्वानंदे जन्म जगून पहावा....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational