सुरवात
सुरवात
वाटल होत तू येशील थोडा वेळ बसशील,
जून काही तरी बोलशील आणी हळूच हासशील.
तस काही झालच नाही आजही तू घाईतच आलीस,
सगळ विसरल्या सारख मोजकस बोललिस.
मी मात्र शांत होतो मनाशी थोडा खंत होतो,
अपेक्षे पुढे वास्तवाशी फक्त नात पाहत होतो.
बोलण्या, चालण्या आणी वागण्यात जरी फरक पडला तरी भूतकाळ विसरत नव्हता,
आता जे चाललय ते गम्मत म्हनून बगन्यातच
मनाचा प्रचार होता.
आधी फक्त वाटत होत आता जाणवत आहे,
परके पणाचा धागा कोण विणत आहे.
सगळ पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू आहे असच वागावे लागेल,
आयुष्याचा काय ते पुन्हा नवी सुरवात मागेल.
