STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

पुरण पोळी ...!

पुरण पोळी ...!

1 min
2.4K


पुरण पोळी...!!!

सणावाराला पुरण पोळी

हमखास घरो घरी ठरलेली

शुक्रवारच्या दिवशी

आंबाबाई साठी पोळी केलेली...


हा हा करीता पोळी

हळूच तव्यावर फुगवायची

अन हळूच अलगद ती

वरच्यावर झेलायची अन परस्पर खायची...


काय सुरेख बेत हा आपल्या

सणावारांच्या खाद्याचा

आठव आणतो अजूनही

सुख भोगल्या दिवसांचा...


मऊ लुसलूसीत पुरण पोळी

त्यावर साजूक तुपाची धार

गरमा गरम ताटात येता

घ्यावा वाटायचा तिचा समाचार...


पुरणाची गोडी जरी तोंड पोळी

तरीही भाग्य असायचे प्रत्येकाच्या भाळी

सणावारी जमायची सारी मांदियाळी

वाटायचे घरीच आहे सारी आळी...


आता गल्ली गेली आळी गेली

प्रगतीच्या बडीमारात पोळी दुरावली

आता घरी नांदायला वाटते सोकावली

पोळीच झाली आता मॉलवाली...


पण आठवण आली तरी

डोळ्यात पाणी आणते

आजही घरो घरी सणावारी तरी

ती अजूनही आवर्जून घरी दिसते....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational