प्राण्यांची शाळा
प्राण्यांची शाळा
1 min
1.0K
प्राण्यांची एकदा शाळा भरली
मुख्याध्यापकाची खुर्ची सिंहाने घेतली
हरिणाला वाटली भिती सिंहाची
सशाची संपेना यादी बडबडीची
माकडाच्या सुरू झाल्या मारणे उड्या
अस्वलाच्या संपेना काही केल्या खोड्या
वाघोबांनी फोडली मधेच डरकाळी
सगळ्यांनी झाकून घेतली कानाची पाळी
जिराफाची उंचच उंच मान
अन् हत्तीची काय सांगावी शान
अशी आहे गमतीदार शाळा
सर्वांना आहे एकमेकांचा लळा