अपुरे शब्द
अपुरे शब्द


शब्दांच्या जादुगारालाच
जेव्हा शब्द अपुरे पडतात
कित्येक नवपरिणीत कविता
उंबरठ्यावरच मग अडतात.
सोप्या सोप्या रचनेलाही
मग खूप सायास पडतात
वरच्या मजल्यावर खूपशी
विचारांची आंदोलने घडतात.
हळव्या तरल काळजामध्ये
ठोके गणितही चुकतात
अस्सल ठेवणीतले शब्दही
अन अभिव्यक्तीला मुकतात.
शब्द अपुरे पडतात तेव्हा
अलंकार निस्तेज पडतात
मनातल्या काही ओळी
मात्र जन्माआधीच खुडतात.