STORYMIRROR

Sugandha Ghude

Fantasy

3  

Sugandha Ghude

Fantasy

स्वप्नांतला राजकुमार

स्वप्नांतला राजकुमार

1 min
578

वेडी मी थोडी अल्लड, आशा वेडी प्रेमाची,

कल्पनेतल्या दुनियेत घेत झेप, ओढ त्या स्वप्नांतल्या राजकुमाराची...


लाजरी बुजरी मी कधी येते गोड खळी, दूरून त्याला पाहताना..            

किती हा शहारा आणी नखरा, जरी स्वप्नी त्याला अनुभवताना..


प्रेमळ मायाळू अन् समजुतदार, असा हा माझा राजकुमार..         

सुखात करु प्रवास जीवनाचा, देऊ एकमेकांच्या जीवनास आकार..


आली संकटे जरी जीवनात, करू सोबत हिमतीने मात..      

एकमेकांच्या सोबतीने करु सैर, या जीवनरुपी समुद्रात...


झाली तयारी मनाची, मनातली गोष्ट ओठांवर आणायची..   

पण, ठेच लागलेलं हे मन सांगतंय, जरा जपून ! नको घाई निर्णयाची..


जसा हवा असा तसाच तो, वाटे आनंद मनाला.. 

पण वेळोवेळी तुटलेलं हे मन जरा घाबरतचं, स्वप्नातही कुणास पहायला...


क्षणात इथे मग क्षणात तिथे, सतत लपंडाव खेळताना दिसतो..       

आनंद आणि प्रेमाचा अनुभव हा, राजकुमार हा स्वप्नातच असतो. वास्तवात कधीच नसतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy