फुलपाखरू
फुलपाखरू


कधी या फुलावर तर कधी त्या फुलावर.. उडणारे ते फुलपाखरू...
छोटी छोटी रोपटे, भासे त्याला जणू कल्पतरू..
झेप त्याची छोटी जरी, पण ती समाधानाची..
कसलीच नाही अशा-अपेक्षा नवल त्याला आपुल्याच आसमंताची..
किती क्षण जीवनाचे, पर्वा नाही त्याला...
क्षणाक्षणात आनंदाची उधळण हाच ध्यास त्याच्या मनाला...
जीवन त्याचे सुंदर, अनमोल ज्ञान देणारे..
स्वच्छंदपणे जगू या, धडे हे मनावर गिरवणारे...
देतो आनंद सर्वांना निरनिराळ्या रंगांचा,
रोम रोम देतो सुख कोमल त्याच्या अंगाचा...
मनसोक्त घेतो आस्वाद, मौल्यवान जीवनाचा..
किती नाही कसे जगलो हाच संदेश त्याचा...