STORYMIRROR

Sugandha Ghude

Others

3  

Sugandha Ghude

Others

तुझी साथ

तुझी साथ

1 min
314

प्रिय आई,


माझ्या डोळ्यांना तुझ्या डोळ्याची साथ हवी..                       

चाचपडले अंधारात मी प्रकाशवाट तुझ्या डोळ्यांनी दाखवावी.   

तुझ्याच सोबतीने सरो माझे आयुष्य काही नको, आई! मला तुझी साथ हवी..  

काही नको आई मला फक्त तुझी साथ हवी..


दुःखात सगळ्यांना वाटते हवी.. मला माझ्या सुखात तुझी साथ हवी..            

आयुष्याच्या प्रत्येक क्षणात भरभरून आनंदासाठी तुझी गोड मिठी हवी..     

सोबत तुझ्या चालण्यासाठी आई! मला तुझी साथ हवी...


डगमगले कित्येकदा आणि घाबरले या परिस्थितीला...           

तरी आशेचा तो मोठा आवाज साद घालत होता मनातला...                  

वाट तुझी प्रकाशाकडे सांगत होता तो रवी..

नको कोणी जवळी मला, आई! मला फक्त तुझी साथ हवी..


करेल मात संकटांवर चढले यशाच्या शिखरावर..             

तू असताना कसली भीती, जिथे जाईल तिथे, तुझी सुंदर छवी.. 

माझे शब्द तू, गीत माझे, माझ्या मनातला तू कवी... आई! मला फक्त तुझी साथ हवी. 

 

साजरे करु सुखदुःखाचे क्षण सोबत जिद्द हिंमत नवी..               

वाटू प्रेम-आनंद क्षणोक्षणी आई! मला फक्त तुझी साथ हवी..        

काही नको, आई! मला फक्त तुझी साथ हवी... 


Rate this content
Log in