ओढ मनीची
ओढ मनीची
ओढ
तुला पाहण्याची
डोळ्यांनी तुला टिपण्याची
सुखी स्वप्न एकत्र रंगवण्याची
ओढ
पाहुण्याच्या चाहुलीची
दोघांत तिसरा येण्याची
सुखी परिपूर्ण कुटूंब होण्याची
ओढ
ध्येय गाठीची
अपयशावर मात करण्याची
यशाचे उंच शिखर चढण्याची
ओढ
देशासाठी लढण्याची
भ्रष्टाचार नष्ट करण्याची
समृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्याची