मन माझे
मन माझे


भास झाला जणू मज, आभाळच वेडे खुणावते,
नयनरम्य त्या ताऱ्यांमधुनी, कोणी हळूच हसून पाहते।
रंगछटा त्या न्याऱ्या न्याऱ्या, जणू सप्तरंगाचा शालू लेऊन,
वाट वाकडी करीत सावल्या, माझ्या मागे आल्या धाऊन।
सैरभैर मन धाव घेई, काटेरी कुंपण ओलांडून ते,
नावलाईचे क्षण घेऊन सारे, माझ्याच मागे धाव घेत
उधळण होते जणू सुमनांची, माझ्या अंतर्मनात रे,
गोल गिरक्या घेते मन हे, जणू धुंद ती पाखरे।
वाऱ्यासवे डौलत डौलत, मन हे होऊन गेले धुंद,
पाहिला सरंजाम सारा, लाजून हसल्या कळ्या कुंद।
होऊन फुलपाखरू बागडावे, धरून उराशी हीच आस,
नाही का रे, याच साठी तर केला होता अट्टाहास।