माझं बालपण
माझं बालपण

1 min

494
नव्हता कोणावर राग
नव्हता कशाचाच मोह,
आणि नव्हती कुठलीच आस
माझं बालपण होतं किती झक्कास...
दोन रुपये मिळाले तरी
कितीतरी आनंद होई,
व्हायचा स्वर्ग मिळाल्याचा भास
माझं बालपण होतं किती झक्कास...
चिंचा बोरे जमा करायची
रानावनात हिंडून,
तरी व्हायचा नाही कसलाच त्रास
माझं बालपण होतं किती झक्कास...
आईच्या कुशीत झोपण्याचा
आनंदच होता काही न्यारा,
कारण तिच्या कुशीत येई चंदनाचा वास
माझं बालपण होतं किती झक्कास...
उगाच मोठी झाले
उडून गेले सारे रंग ,
तरी मजला त्याच विश्वाचा ध्यास
माझं बालपण होतं किती झक्कास...