STORYMIRROR

Shubhangi Thorwat

Children

3  

Shubhangi Thorwat

Children

माझी माय

माझी माय

1 min
320

लेक हसती खुदूखुदु,

माईच्या डोळा येते पाणी।

कष्टती ती माय पोरीसाठी,

भटकत राहते रानोरानी।।


त्रास नको व्हाया पोरीला,

म्हणून उपसत राहते कष्ट।

जळमटलेल्या समाजातील,

साऱ्या रीती करावया नष्ट।।


दारुड्या नवऱ्याच्या त्रासामुळे,

एकांतात ती रडत राही।

माझी लेक होणार मोठी,

हा विचार करता आनंदून जाई।।


माझ्या पोरीला करील मोठी ऑफिसर,

तिची येणार नाही कुना सर।

माईच्या डोळ्यात साठते तिची मूर्ती,

साऱ्या जगात वाढेल तिची कीर्ती।।


आयुष्य झिजवलं पोरीसाठी,

कौतुक तीच करीत राही।

पोरीच्या नितळ डोळ्यांमध्ये,

दिसते फक्त तिची आई।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children