STORYMIRROR

Shubhangi Thorwat

Tragedy Others

3  

Shubhangi Thorwat

Tragedy Others

पारवा

पारवा

1 min
71

एके दिवशी एक पारवा 

हळूच माझ्या अंगणात आला 

त्याच्या माझ्याकडे बघण्याने 

माझा जीव भुलून गेला,


मी हसले त्याच्याकडे पाहून 

त्यानेही प्रतिसाद दिला पंख फडफडून 

मी त्याच्यासमोर हात पसरला 

तसा तो माझ्या हातावर चढला,


मी त्याच्या डोळ्यात पाहिले 

त्याचे डोळे खूप काही सांगून गेले 

त्या गर्दीला विसरून एकटेपणच त्याला खूप भावले होते, 

माझा जीव त्याच्यावर जडला, 

जणू माझे प्रेम मला सापडले होते,


तेव्हापासून मी रोज त्याची वाट पाही 

तसा तो माझ्याकडे रोज येऊन जाई 

मलाही जणू त्याचे वेड लागले होते 

खरे पाहता त्यानेच मला वेड लावले होते,


तो त्याच्या थव्यात कधी जात नसे 

माझ्याच अंगणात नेहमी खेळत असे 

मला वाटले हा मला सोडून जाणार नाही 

कारण मीच होते त्याची मैत्रीण, सर्वकाही,


एके दिवशी माझा पारवा आलाच नाही 

मी त्याची खूप वाट पाहिली, पण व्यर्थ... 

त्याच्यामुळे माझा जीव वेडावून गेला 

तेव्हा कोणीतरी मला सांगितले की माझा पारवा

थव्यासोबतच उडून गेला.


तो अजूनही आला नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy