पाठवण
पाठवण


नयनी अश्रू दाटुनी येती, ओघळती घळा घळा।
पदराला मग पुसुनी डोळे, बांगडयांशी उगाच चाळा।
मातृहृदय पिळवटून जाई, लेक सासरी धाडता।
बाप एकांतात रडतो, सांगेल कुणाशी तो व्यथा।
समाजाची रीत राया, करावया हवी पुरी।
बाप खातो साऱ्या खस्ता, वेडी आस धरून उरी।
उंबरठा ओलांडून जाता, लेक झाली परकी।
माप ओलांडून जाईल, तोवर माझी लाडाची पोर ही।
असा कसा टाकू पदरात कोणाच्या, माझी लाडाची लेक।
लागेल जीवाला घोर, असे क्षण येतील कित्येक।
सोनूली जाईल घर सोडून, तेव्हा बाप जाईल खचून।
माईची जीवाची मैत्रीण जाता, राहील हसू फक्त ओठांवरून।
गप्पा टप्पा रंगत मायलेकींच्या, रंग सुखाचे भरून।
खेळ चालला अश्रू अन् पापण्यांचा, दुःखे जातील सरून।