तुझा रुसवा
तुझा रुसवा

1 min

12K
'तुझा रुसवा म्हणजे एक लडिवाळ खोड आहे,
तोच तर दर्शवतो तुला माझी किती ओढ आहे.'
'तुझा रुसवा म्हणजे काही क्षणांचा खेळ असतो,
थोडासा राग आणि खूप सारं प्रेम असा मेळ असतो.'
'तुझा रुसवा म्हणजे एक अबोल अशी साद असते,
माझ्या तुझ्यावर भुलण्याला हळुवार अशी दाद असते.'
'तुझा रुसवा म्हणजे शरदातील चांदणं,
असा जिव्हाळ्याचा रुसवा माझं जन्माचं आंदण.'
'तुझा रुसवा म्हणजे खळाळणारा झरा,
जशा बरसती श्रावणातल्या जलधारा.'