ते क्षण
ते क्षण

1 min

140
ते क्षण सुखाचे अन् आनंदाचे,
हाती देऊनी हात हुंदडायचे,
जणू होऊनी फुलपाखरे,
रंगबिरंगी फुलांवर बागडायचे...
ते क्षण अवखळ अन् निरागसतेचे,
करुनी भांडण लगेच बिलगायचे,
ना हेवा, मत्सर कळे त्या मना,
हवे तेव्हा मनसोक्त नाचायचे...
ते क्षण हट्टाचे अन् खोड्यांचे,
विनाकारण कधी पोटभर रडायचे,
कधी काढूनी मनसोक्त खोड्या,
आणि स्वतः मात्र निखळ हसायचे...
ते क्षण होते माझे अन् माझ्या बालपणाचे,
आता फक्त आठवायचे अन् हसायचे,
कारण निरागसतेचं संपलय पर्व,
हे क्षण फक्त समंजसपणे जगण्याचे...