कविता..
कविता..
उगीच नाही कुणी त्याला कवी म्हणत
तुला तयार करण प्रत्येकाला नाही जमत ..
फुलांची गुंफण करून माळ करणे सोपे जाईल
शब्दांची जुळवणी करायला कोण बरं पुढे येईल ..
नुसती शब्दांची रचना करून नाही तुझं भागत
प्रशंसा तुझी झाल्याशिवाय अर्थ तुझा नाही लागत..
तुझी सुंदरता वाढवायला खूप शब्दाचा साठा लागतो अप्रतिम तुझी निर्मिती व्हावी हेच एक कवी मागतो..
✍️ कविता सचिन रोहने
सातारा ,महाराष्ट्र
