काळ कोणाचा..!
काळ कोणाचा..!


कोणा न ठावे काळ कोणाचा,
वेळ बाकी हा किती कोणाचा,
आहे बाकी जो तोलामोलाचा,
त्यात न सुटावा तोल कोणाचा.
डाव मांडला हा असे क्षणाचा,
होईल खेळ इथे कधी कोणाचा,
येईल कसा तो दिवस उद्याचा,
असेल खोलात पाय कोणाचा.
मंगल मन अन् सुमंगल वाचा,
लाभो प्रत्येका हीच सदिच्छा,
क्षण कीर्तीचा आणि यशाचा,
मिळो सर्वदा हृदयी शुभेच्छा.
देव कृपेचा ना राज छायेचा,
जगी सर्वा थोर आशिष आईचा,
हात डोक्यावर राहो पित्याचा,
मित्र सदा असे तोच हिताचा.
सर्वा अंगी राम राम सर्वांचा,
रामनाम गाई थेंब थेंब घामाचा,
जो गाळी घाम तोच रामाचा,
राम ना माने तो ना कामाचा.