STORYMIRROR

Prashant Shinde

Romance Fantasy

3  

Prashant Shinde

Romance Fantasy

आमावश्येची रात्र...!!

आमावश्येची रात्र...!!

1 min
494


अमावश्येच्या रात्री एक

चांदणी येऊन भेटली

आणि मला म्हणाली

मला जरा रस्ता दाखव....


इतकी तेजस्वी ती

तिच्या आभेने

सारा आसमंत

तेजोमय झाला....


तिच्या लावण्याने

मी मंत्रमुग्ध 

आणि बेधुंद कधी झालो 

ते कळाले नाही...


तिला म्हंटले

तू अशी अपरात्री

कशी काय

एकटीच आलीस ?


ती मला म्हणाली

चांदण्या रात्री

द्वाड लख्ख 

चांदणे पडते...


मला बाई

चांदण्यात

फिरताना

खरोखरच लाज वाटते...


मी हसलो

आणि म्हणालो

बरे झाले तू

काळोख्या रात्री आलीस..


नाहीतर चांदण्यात

आपलं प्रेम

चंद्रान चोरून

पाहिलं असतं..


आणि प्रिये

भलतच नको ते

लफडं

झालं असतं...


ती लाजून

चुर चुर झाली

तशी मला

पहाटे जाग आली...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance