STORYMIRROR

AnjalI Butley

Fantasy

3  

AnjalI Butley

Fantasy

राजेशाही आराम

राजेशाही आराम

1 min
317


मिळेल का एक दिवस

राजेशाही आराम करण्यास


असेल मी एकटी लोळत 

दुपारचे १२ उजडेल

किलकीले डोळे करण्यास....


नसेल कसली घाई

बिछान्यातच आरामात

लोळत मी राहील...


दिवास्वप्न पाहण्यात

मग्न मी राहील

राजेशाही आराम करताना...


नसेल मोबाईल हाती

सोशल मिडियावर

अपडेट पाहण्यात-करण्यात...


आरामात लोळताना

हाताचा धक्का लागला

टेबल लॅम्प खाली पडला...


राजेशाही आरामात 

दुर्लक्ष केले त्या कडे

बिछान्यातच लोळण्याचा आनंद घेत राहीले!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy