STORYMIRROR

Manasi Wavade

Romance Fantasy

3  

Manasi Wavade

Romance Fantasy

चंद्र तू मी फुलपाखरू

चंद्र तू मी फुलपाखरू

1 min
330

तारे भासवतात सहवास तुझा 

चंद्र म्हणवतो स्वतःला तू ,

तू फुलराणी , जगाची दिवानी

तुझमागे फिरणारे मी फुलपाखरू


हास्यातुन तुझ्या रोषणाई मिरवते 

तेज स्वतःचे चोहीकडे,

सूर्य हि थांबतो, नजर मांडतो 

जिथवर तुझे पाऊल पडे 


पाहण्यास तुला जरा अडून आलेलो 

अडखळलो पाहून तुला ,

प्रेमी नसण्याचे खंत , तुझपुढे नाही जिवंत 

जर देशील होकार तू आज मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance