मुंबईकर सदा सुखी
मुंबईकर सदा सुखी


लिहिणं सोप्प आहे,
कारण जगणं कठीण आहे.
सगळच सरळ असतं,
तर सांगायला वेगळं माझ्याकडे काहीच नसतं.
तो तुझ्या वाकड्यात शिरला नसता,
तर मी प्रतिसादाबद्दल काय बोलले असते,
सगळेच लाडी गोडीने राहिले असते,
तर अट्टाहास आणि प्रयास ह्यांना मोल कसले?
जगण्याचे गुपित शोधण्यात गुंतायला,
जगण्यात काही गुपित आहे,
असे तर वाटायला हवे.
लिहिणं सोप्प आहे,
कारण जगणं कठीण आहे.
सगळच सरळ असतं,
तर सांगायला वेगळं माझ्याकडे काहीच नसतं.