पावसा पावसा लवकर ये
पावसा पावसा लवकर ये
बाबाचा हात धरुनी मी कधी
रानावनात त्या भटकत होतो
नजर चुकवुनी मी तर त्याची
पावसात कधी भिजलो होतो
भिजल्या तो मला पकडण्या
बाप माझा मागे धावत यायचा
दोन रपाटे पाठीवर मारत मारत
झोपडीत ओढतच मला न्यायचा
आज जेव्हा मी त्याला पाहीले
दारी एकटाच तो बसला होता
डोक्यावरती हात ठेवुनी, त्या
वर आभाळाकडे तो पाहत होता
थोडेसेच मला ते समजत होते
चार वर्षे तो पाऊसच नव्हता
जीमीनही कोरडी पडली होती
आणि बाप माझा रडला होता
मीही आता ते ठरविले तसाच
शिडी घेऊन,आकाशातच चढलो
ढगांना हात लावला, जागेकरुनी
तो पाऊस पाडण्या मी सांगुन आलो
