STORYMIRROR

Govindvind Deshpande

Others

3  

Govindvind Deshpande

Others

ती कां गप्प राहते

ती कां गप्प राहते

1 min
14.6K


पिता,पती तो पुत्र सांगतो

देवाहुनि ती मोठी आई

जाळ्यात त्या अशी गुंतली 

अजुनही ती सुटली नाही 

रुढी परंपरेच्या नावाखाली

पिढ्यान् पिढ्या असेच घडते

खरचं तीला ते समजत नाही

कां समजुनही गप्प राहते

प्रश्न एक तो तसाच अजुनि 

कां वंशाचा तो दिवा चमकतो

उत्तर त्याचे माहीत नाही 

पणतीचा कां त्या उजेड नसतो 

मुलगा आणिक मुलगी दोघे 

जन्मही उदरी तीच्याच घेती

अधिकार ते पुरुषाला सारे

असते स्त्री ती कामा पुरती

कधी तरी असे घडून येईल

शक्तीची तीला जाणीव होईल

बंध गुलामीचे क्षणात तोडुनि

जगणे शापित ती सोडुन देईल


Rate this content
Log in