STORYMIRROR

Smita Doshi

Fantasy

3  

Smita Doshi

Fantasy

भूत

भूत

1 min
617

अरे बापरे, भूत----

ये भूता, नको ना रे मला घाबरवूस

माझ्या पाठी असा नको लागूस

काय बिघडवलं रे मी तुझं

तुझं नि माझं नाही दूरचंही नातं----


घाबरवून मला पळवू नकोस

मांत्रिकाला बोलावून, झाडून झोडपून 

चढवेन तुला मी झाडावर

कळलं, आता नको माझ्या मागे लागूस-----

तू कुणाचं रे भूत ?

भ्रष्टाचाराचं, दुशमनीचं, की असत्याचं?

अरे चोख आहे माझं काम

जा,जाऊन दुसऱ्या च्या मागे लाग----


मी काही तुला घाबरणार नाही

तू कुणाचा आत्मा आहेस

उगीच बदनाम नको होऊस

जा, जाऊन निपचित पड----


जिवंतपणी देव देव केला नसशील

म्हणून अतृप्त आत्मा बनून भटकतोस

जा , देव देव कर, सर्वांना अभय दे

पुढच्या जन्मासाठी सद्गती घे-----



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy