निसर्ग
निसर्ग
का रे, तुझ्याच धुंदीत तू गर्क?
एकदा बघ ना पुन्हा मानवाकडे वळून
रुसलास का,
माणूस तुझ्यापुढे जातो आहे म्हणून?
पण तुला माहित आहे,
मानवाचे हे प्रयत्न व्यर्थ आहेत
तुझ्या विरोधात जाण्याची शिक्षा भयानक आहे
मानवाच्या आजच्या प्रगतीमध्ये त्याचाच विनाश आहे..
तुझ्या नियमांना डावलणे म्हणजे मरण ओढवून घेणे आहे
कबूल आहे,
तुझ्या विरोधात प्रदूषण,प्रलय,हाहाकार आहे
पण काय रे,
मानवाने स्वतःचा विकास करणे गैर आहे?
माहित आहे,
योग्य मार्गाने केलेले प्रयत्न सार्थ आहेत
पण,आज माणूस विसरलाय तुला आणि स्वतःलाही
प्रगतीच्या वेडात वाहवत चाललाय
भ्रष्टाचाराच्या स्फोटात स्वतःच भस्म सात होत चाललाय..
अरे,सावर रे त्याला,
आधुनिकता,सुधारणा,साक्षरतेच्या
जाळ्यात स्वतःच अडकत चाललाय
स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतो आहे
>तुझ्या विरोधात जाण्याची शिक्षा अघोर आहे
पण माणसाच्या बुद्धीला कुठे सीमा आहे?
सेकंनदापेक्षा जोरात त्याचे विचार पळतात
मग मध्येच कुठेतरी जोरात धक्के बसतात
त्यात एखादी माळीण सारखी वस्ती पाण्यात वाहून जाते
तुझ्या विरोधात गेल्याची ती शिक्षा असते
तुझ्याशी माणसाची कधीच बरोबरी होऊ शकत नाही
पण हातावर हात धरून बसूनही चालणार नाही
आता तूच सांधना या दोन्हीचा मेळ
म्हणजे होणार नाही तुझी ही घालमेल
पुन्हा पूजेल,वंदेल माणूस तुला
योग्य मार्ग दाखवना रे त्याला।
जीवनाच्या या नागमोडी वाटेवरून जाताना
तो मध्ये मध्ये अडखळत , भांबावत
आहे
तुझ्या मदतीची त्याला गरज आहे
विकासाच्या नादात त्याची माणुसकी हरवली आहे
ती त्याला परत मिळवून देण्याची जबाबदारी आता तुझी आहे
वासनांध झालेल्या या नराधमाला
निसर्गा, ये ना एकदा जाब विचारायला.