STORYMIRROR

Smita Doshi

Romance

3  

Smita Doshi

Romance

सख्या सजना

सख्या सजना

1 min
231

सख्या सजनारे, माझ्या प्रियकरा रे

कधी भेटशील मला तू सांगना रे

डोळ्यात प्राण साठवून वाट पाहत रे

तुझ्याविन रात्र दिन उदास रे----

तू नसता जवळी आठवते मज

तूझी ती घट्ट हवीहवीशी मिठीरे

तुझ्या बाहूुत मी समरसून जगते

तूझ्या माझ्यातील दुरत्व सम्पते-----


तुझ्या खट्याळ नेत्र पल्लवाने रे 

होते मी लाजेने चूरचूर रे

आसपास असता माझ्या सख्या रे

तोंड ओंजळीत मी लपवते रे-----


जातोस जेव्हा तू दूर देशी रे

एकही क्षण न जाई आठवणीशिवाय रे

केलेले आपण गोड कूजन रे

मज साद घालती वेडी रे----


बेभान होऊन मी धावते रे

तू जवळी असल्याचा भास होतो रे

धावत जाता जाणवते ते मृगजळ रे

सख्या सजना येना लवकर परतून रे



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance