आभास हा
आभास हा
केव्हाची आस घेऊन बसलो आहे
केव्हाची साद देऊन बसलो आहे
तुझ्या येण्याची वाट पाहतो आहे
तुझ्या भेटीसाठी जीव आसुसला आहे...
तुझ्या त्या निरागस डोळ्याची बाहुली
पापण्यात स्वतःला नकळत लपवत आहे
इतके काय लाजायचे गं
मी तुझा नि तू माझीच ना गं...
तुझे नयन बावरे भुलवतात मला
तुझ्या अस्तित्वाची स्वप्नं दाखवतात
तेव्हा माझा न मी राहतो
आपल्या प्रणयाच्या स्वप्नात रंगून जातो...
तुझे नाजूक रेशमी बाहूंचे हार
मला सारखे सारखे आठवत असतात
प्रितीच्या बंधनात अडकण्यासाठी विनवत असतात
जिकडे तिकडे तुझाच भास करत असतात...
ये ना गं, तू लवकर जवळी
पाहू दे तुला अशी डोळे भरुनी
तुझ्या केवळ दिसण्यातही मला सुख आहे
त्यातही तुझ्या-माझ्या मिलनाचा आभास आहे...

