... आत्मा झुरतो तिच्यासाठी...
... आत्मा झुरतो तिच्यासाठी...
... आत्मा झुरतो तिच्यासाठी...
तिच्या विरहात उरले
फक्त माझे शरीर
मन गेले तिच्याकडे
बनेल तिचा आधार
ती परी बनून
राहते स्वर्गलोकी
आत्मा माझा आहे तिच्याबरोबर
वावरतो नुसत्या शरीराने मी भूलोकी...
तिच्या आठवणीत
गात्र गात्र गळाले
ह्रदयाविन शरीर माझे
नाममात्र राहिले...
भेटीसाठी तिच्या
जीव माझा तळमळतो
तिच्या मिलनासाठी
आत्मा माझा झुरतो..
आता फक्त एकच आस
तिच्या भेटीला नयन आसुसले
नजरेला तिचाच ध्यास
तिच्या वाटेकडे नयन झुकले..

