तिचं समोर येणं...!
तिचं समोर येणं...!
तिचं समोर येणं...!
तिचं समोर येणं,
टाकते मला भारावून!
हसून तिचं पाहणं,
अन् जातो मी हुरवून!!
तिचं समोर असणं,
टाकते माझे मन बावरून!
आणि तिच्या नजरेत फसन,
मीच जातो कावरून!!
मान्य तिचे माझे नसन,
बघतो तिला दुरून!
दूर तिच्यापासून बसन,
मनाने आपले करून !!
तिचं दुसऱ्या सव जाणं,
टाकत जाते नाते दुरावून!
ठरते माझ्यासाठी जीवघेणं,
घेते आनंद हिरावून!!
जवळ तिच्या नसण्यानं,
घेतो स्वतःला सावरुन!
नाही डगमगायच तिच्या असण्यान,
स्वतःचे अस्तित्व विसरून!!
