STORYMIRROR

Kakade Tejas

Tragedy

3  

Kakade Tejas

Tragedy

ती आणि मी

ती आणि मी

1 min
265

केली होती सुरुवात ,

तुझ्यासोबत बोलायला,

वाटलं होतं मला,

मिळेल माझं पहिलं प्रेम,

पुन्हा एकदा मला,

बोलायला लागलो मी रोज तुझ्याशी,

अन अचानक एके दिवशी,

तू सांगितलं मला त्याच्याविषयी,

आणि जागेवर स्तब्ध झालो मी,

वाटलं मला नशीब च माझं खोट आहे,

जे आवडतंय ते काहीच मला मिळत नाहीये,

अश्यातच तू म्हणालीस,

बोलत जा माझ्याशी,

मनातलं सांगत जा

मला सर्वकाही,

मग मी पण सांगत गेलो,

तुझ्यापाशी मनातलं सर्वकाही,

याच सगळ्यातून तू पुन्हा

मला आवडू लागलीस,

पण तुझ्या आयुष्यात आहे,

आधीच कोणितरी,

पण आता सवय झालीये इतकी,

की आता त्रास होयला लागलाय मला,

म्हणून म्हणतो लांब जाऊ एकमेकांच्या

म्हणजे होणार नाही त्रास 

कोणाचा कोणाला

तू पण सुखी राहशील 

आणि मी सुद्धा.........



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy