सदाबहार काव्यांजली भक्तीरसाची
सदाबहार काव्यांजली भक्तीरसाची
देव विठ्ठल
भाव माझा विठ्ठल
मन विठ्ठल
अंतरंगी ||१||
भाव माझा
तूच माझा देव
तुझ्यावरी जीव
जडलासे ||२||
त्रैलोकी झेंडा
उभा भक्ती मार्ग
मिळेल स्वर्ग
पंढरीत ||३||
दीनाचा कैवारी
अनाथांचा हो दाता
भवदुःख त्राता
पांडुरंगा ||४||
आषाढी कार्तिकी
दुमदुमली ही पंढरी
अवघी नगरी
प्रफुल्लित ||५||
भजन कीर्तन
मुखी नाम घ्यावे
भजनी रमावे
सदासर्वदा ||६||
मृदुंगाचा नाद
टाळ चिपळीचा साद
विठ्ठल प्रसाद
पंढरीत ||७||
विठ्ठल माऊली
माझी मायेची सावली
गुण गायली
अभंगात ||८||
धन्य जाहलो
पाहता सावळ्या हरीला
जीव वेडावला
भक्तीरूपे ||९||
जगाचा पालनकर्ता
सृष्टीचा तो पालक
ऐकुनी हाक
धावतसे ||१०||
संताचिये नगरी
झाली पुण्यवान आज
चढविला साज
भक्तीभावाचा ||११||
सुगंधीत फुले
चला हरीला वाहूया
भजनी नाचूया
धुंदपणे ||१२||