Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gaurav Daware

Drama Fantasy Inspirational

4.0  

Gaurav Daware

Drama Fantasy Inspirational

कोकण वारी

कोकण वारी

2 mins
280


कोकणाची आहे काही शानच भारी

तिची सुंदरता जणू काळजाचीच चोरी

मनमोहकता म्हणजे शंभर हजारी

तिच्या औदर्यापुढे मी झालोय कैवारी


तिचा इतिहास म्हणजे शब्द ललकारी

मारतात काळजात हजार तलवारी

क्षणात उभे राहतात अंगावर काटे शहारी 

डोळ्यातले अश्रू जणू वेदना धारदारी


प्रत्येक भूमीचा इतिहास असतो अवतारी

पण कोकणाचा इतिहास अभिमानाचा वारी

नाचतो सेवक राजाच्या दरबारी

इतिहास एकूण आग लागते हृदयावरी


इतिहासाची सुरुवात तर फक्त शब्द लाचारी

ऐकतो श्रोता बनून स्वयं अवतारी

मानतो अभिमान त्याच्या रक्ताच्या थेंबावरी

जेव्हा कोकणाची संस्कृती दिसते दमदारी


महाराष्ट्र, गोवा अन कर्नाटक वारी

कोकण समजण्याची पूर्ण तयारी

मनमोहक सौंदर्य तिच आहे धारदारी

मनात साठवणारा बनतो तिचा कलाकारी


केळी फणस अन आंबे रसदारी

डोंगर उतारावरची भातशेती सुंदर भारी

निसर्गाचा वरदहस्त जणू कोकण साक्षीदारी

तिच्या किमयेपुढे मी झालोय तिचाच कैवारी 


कोकण म्हणजे खरंतर स्वर्गच भारी

संस्कृतमध्ये तिला अपरान्त म्हणतात सारी

बेटांनी नटलेली ही सुंदर चित्रकारी

कविता लिहिताना मन गातंय गीतकारी


कोकणचा इतिहास आहे लयच भारी

श्री. परशुराम म्हणजे विष्णुचे सहावे अवतारी

त्यांनी सह्याद्रीला बाणाने हलवलं अलवारी

आणि कोकणची निर्मिती केली भूमीवरी


श्री. परशुरामांची तर काही किमयाच भारी

कोकणस्थ ब्राम्हण हे त्यांचेच अविष्कारी

त्यांचा इतिहास म्हणजे सत्य दमदारी 

श्री. परशुराम म्हणजे कोकणचे पुत्र चमत्कारी


कोकण प्रदेश तटस्थ आहे चार सीमेवरी

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अन गोवा क्षणभरी

किमया या प्रदेशांची कोकणासाठी पुत्र सारी

सर्वांना एकत्र जोडून कोकण उभा शानदारी 


कोकण आहे खरा अमूर्त किल्लेदारी

वसई, जंजिरा मी नाव घेऊ कितवरी

बेटांच्या बाबतीतही कोकण खूपच भारी

साष्टी, खांदेरी, उंदेरी जणू न संपणारी


कोकणातील खाडया यातर खऱ्या अविष्कारी

दातीवरा, वसई ते तेरेखोल क्रमवारी

कोकणातील बंदरांची तर शानच भारी

मुंबई अलिबाग मुरुड आहे अजून कित्येकसारी


कोकणाच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र खारवारी

तर उत्तरेकडे नटलेली मयुरा नदी तिच्या दारी

दक्षिणेच्या गंगावल्लीने तर वेढल आहे सारी

अश्या भूमीत जन्म म्हणजे पुण्यच भारी


मराठी कोकणी मालवणी भाषा अलवारी

साक्षरतेत गाठतेय ती शिखरे सारी

प्रत्येक तिथला व्यक्ती बनून अनुस्वारी

कोकणला बनवतोय खरा अलंकारी


खेड तालुक्यातील मोजे तिथलं आकर्षण भारी

पांडव काळातील स्वयंभू शिव मंदिर उत्तम सारी

गणपतीपुळे खरंतर टिळक कपाळावरी

कुणकेश्वर देवगड म्हणजे स्वर्गच भारी


कोकणाशिवाय पर्यटन म्हणजे आहे शून्यसारी

थंड हवेची ठिकाणे म्हणजे गारवा अंगावरी

माथेरान आंबोली मी नाव घेऊ कितवरी

संपत नाही, काय करू कोकण आहेच भारी


कोकणावरती पुस्तके लिहिली कित्येकांनी सारी

अनुभव घेऊन जगावं असा कोकण अविष्कारी

कुटुंबाला आनंद द्यावा तर करा कोकणची तयारी

जाऊन बघा एकदा तो स्वर्ग आहे खरच भारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama