मी व्यसनी.....
मी व्यसनी.....
मी धावतोय
मी धावतोय अश्या समुद्राकडे
जिथे पोहचण्याच माझ्याकडे कुठलंच कारण नाही
मी धावतोय अश्या मृत्यूकडे
जिथे पोहोचताच माझा मृत्यू निश्चित आहे
वाटेवरच्या माणसांना मी मात्र सोडतोय
प्रेयसीच्या हाकेवरही मी कसला थांबतोय
मृत्यूच्या दारात मी आणखी वेगाने जातोय
त्या समोरच्या समुद्राकडे मी एकटाच धावतोय
आई-वडील घरी माझी वाट पाहताय
मृत्यू मात्र मला आता ओढतच नेतोय
वळण चुकवत मी आता दिशाही विसरतोय
पण समोरचा समुद्र मात्र अजूनही हाक मारतोय
प्रेयसीची हाक त्या समुद्रापेक्षाही गोड हाय
पण मृत्यूच्या रागात मी कसल काय करतोय
हृदयात आहे प्रेम पण शरीरात मात्र काहीच नाय
व्यसनाच्या नादात मी मृत्यलाच मिठीत घेतोय
मृत्यूचा विशाल समुद्र समोरच थाटलाय
मला कवेत घेण्यासाठी आज तो नटलाय
निळा त्याचा रंग पण मला लाल दिसतोय
मृत्यूच्या नादात कदाचित मी रंगच विसरलोय
मृत्यूवेळी मी कदाचित थोडा वेडा होईल
प्रेयसीची आठवण कदाचित पुन्हा पुन्हा येईल
मृत्यूनंतर स्वतःच शरीर मरून जाईल, पण
आठवणी असतात अमर त्याला कस मारता येईल
समुद्र आहे खारा मी त्याचा गुलाम हाय
व्यसनाच्या नादात मी स्वतःला मारतोय
जीवन असत खरंच गोड पण मला किंमत नाय
रडत रडत मरूदे मला कारण मी व्यसनी हाय
आता आकाश गडगडतय, माझं मन रडतय
कदाचित मला मारण्यासाठी सृष्टी एक होतेय
कोमजलेल्या हृदयातही माझे अश्रू मात्र दाटताय
व्यसनापाई शरीर झालंय पोकळ म्हणून लढण्याची हिम्मत नाय
अग आई भीती वाटतेय तु कुठे न मी कुठे जातोय
मृत्यूचा आवाज आता माझ्या कानापाशी नांदतोय
क्षणभर मजेसाठी मी आयुष्य रस्त्यावर मांडतोय
सगळे करताहेत कमाई अन मी विकला जातोय
धावत समुद्राजवळ पोहचताच मरण निश्चित हाय
वळून मागे बघताच वाटेवरची प्रेयसी आठवतेय
आई-वडील घरी कदाचित आताही वाट पाहताय
पण व्यसनाच्या नादात मी मृत्यूला मित्र बनवलय
म्हणून.........
मी धावतोय
मी धावतोय अश्या समुद्राकडे
जिथे पोहचण्याच माझ्याकडे कुठलंच कारण नाही
मी धावतोय अश्या मृत्यूकडे
जिथे पोहोचताच माझा मृत्यू निश्चित आहे
माझा मृत्यू निश्चित आहे.
