STORYMIRROR

Shivam Madrewar

Drama Romance Fantasy

3  

Shivam Madrewar

Drama Romance Fantasy

तू नसूनही तुझ्या असण्याचा मला भास होतो

तू नसूनही तुझ्या असण्याचा मला भास होतो

2 mins
332

त्या कागदावरती मी काळ्या शाईने भावना रंगवतो,

त्याच भावनांमधुन मी कविता त्या रचतो,

त्या भुतकाळाकडे आश्चर्याने पाहतो,

तु नसुनही तुझ्या असण्याचा मला भास होतो.


अचानकपणे मी मध्यरात्री झोपेतून उठतो,

तु लिहिलेले प्रेमपत्र मी वाचुन काढतो,

खिडकीमधुन बाहेर मी त्या चंद्राकडे पाहतो,

तु नसुनही तुझ्या असण्याचा मला भास होतो.


तुझ्या सोबतच्या त्या आठवणी मी आठवतो,

त्या वरती मी खुप लिहीण्याचा प्रयत्न करतो,

शेवटी एकटाच डोळे ओले मात्र करतो,

तु नसुनही तुझ्या असण्याचा मला भास होतो.


पहाटे पहाटे मी त्या बागेमधुन फिरतो,

गुलाबाच्या लाल कळी कडे मी प्रेमाने पाहतो,

त्याचक्षणी मी सर्व काही विसरून जातो,

तु नसुनही तुझ्या असण्याचा मला भास होतो.


ग्रंथालयात पुस्तकांसोबत मी राहतो,

सांजवेळी एकटाच बडबडत बसतो,

गाई-वासरांना परतताना मी पाहतो,

तु नसुनही तुझ्या असण्याचा मला भास होतो


आरसा मला माझेच प्रतिबिंब दाखवतो,

खिडकीतून मी तुला अचानक पाहतो,

पाहताक्षणीच मी वेळ-काळ विसरतो,

तु नसुनही तुझ्या असण्याचा मला भास होतो.


क्रोध आला की एखादी वस्तु फोडून टाकतो,

आनंद आला की त्याच वस्तुला मी जपतो,

दुःखामध्ये नेहमी मी एकटाच वावरतो,

तू नसूनही तुझ्या असण्याचा मला भास होतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama