Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Anuj Kesarkar

Drama Others

3.5  

Anuj Kesarkar

Drama Others

मासळी

मासळी

2 mins
11.2K


परवा पंचगंगेत उडी मारली,

हाताला मालवणची मासळी लागली

ती तशीच पिशवीत कोंबून,

मुंबईला आलो.....


मासळी मार्केटात उभा राहिलो

मासळी विकावी म्हणून

तेवढ्यात कोणीतरी बाजूला बोंबललं,

मुंबई विकायची आहे, मुंबई विकायची आहे.....


पुरा अवाक् झालो,

मासळी पडली बाजूला....

पुन्हा मासळीला हाताशी धरून,

चालू लागलो.....


चालता चालता टॅक्सीत बसलो,

बसता बसता, लालबागला पोहोचलो

उतरता उतरता,

टॅक्सीवाला म्हणाला यह लालबाग है,

मी मोठयाने ठासून म्हटलं

हा यही लालबाग है, हा यही लालबाग है.....


त्यावर तो टॅक्सीवाला स्टेरिंग सावरत पुढे म्हणतो कसा,

यहां पर कोणसा बाग लाल है,

डोक्यात गेला टॅक्सीवाला,

जाणारच ना हो,

मला सांगा भेंडी बाजारात भेंडी असते का नाही ना,

मग हे,

लालबाग लाल कसं असेल बरं,


याचा गालचं लाल करावा,अस मनात ठरवून,

इतक्यात सहिष्णुतेने लगोलग जन्म घेतला,

उगारलेला हात पहिल्या मजल्यावरून लिफ्टने जसं धाडकन खाली यावं तसा आला गुमान,

आपला हात जगन्नाथ

नाथाचं माहीत नाही,पण आपण जग आहे याचं समाधान केवढं...

म्हटलं जाऊ दे ,

मोठ्याने म्हटलं त्याला, 

जावं जावं......


जाता हुं साब जाता हुं, यहाँ पर रहने थोडी आया हुं, म्हणतच त्याने रस्ता धरला

आयला इथे राहायला कोण येतं...

खूळ कुठंचं,

खूळ मूळ गाठू पाहात होतं....

सोडून दिलं,

बराच अवघडलेला पाय झटकून दिला,

असे पाय झटकणे बरं असते

अध्ये मध्ये...........

ओढणाऱ्यांनी ओढून ओढून,

चप्पल तर तुटली नाही ना हे 

पाहाता येतं.....


त्याच पायाने थेटरात घुसलो,

कॉम्रेडच्या नाक्यावर,

भारतमाता आपली ठाण मांडून बसलेली

शिरल्या शिरल्या तिकीट काढलं,

मागच्या सीटने बसायला दिलं......

प्रत्येक ठिकाणी उभं राहून राहून,

पाय दुखणं काढतात

जोमकस पायांनी गाठायचं अजून अंतर बरचं आहे......


आणि हो,

सिनेमा बसून पहावा, हसून दाद द्यावी

उगाच आपलं......

चिमणी पाखरं, माहरेची साडी वैगरे सॉलिड सॅड सिनेमात हमखास रडण्याची सोय आहे,

तिथे रडावं....

हे भावनिक असण्याचं ठळक चिन्ह 

नाहीतर कसलं ते हृदय दगडाचं......


तीन तासाचा फिक्चर,

लाईट, फाईट, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा असं सगळं सगळं झाल्यावर बाहेर पडलो

आपलं आयुष्य,

तरी काय वेगळं असत याहून..

तेच समोर बघण्याची ,

पडद्यावर सोय.......

कसलेल्या नटासारखं, नटनट्यांनी वठवलेला अभिनय पाहात खुर्चीला बिलगायचं....

खुर्ची धरायची सवय अशीच.....


पडदा पडतो, फिक्चर संपतो

आपण उठायचं,

बाहेर पडता पडता

हलकं फुलक पॉपकॉर्न खात

विचार केला,

हे पॉपकॉर्न पन्नास रूपयांचं

हातातली मासळी तर याहून महाग

आणि मुंबई तर याहून महाग.........


म्हणत म्हणतच...

चालू लागलो,

चालता चालता,

दादरला पोहोचलो,

चालत चालत पार्कात पोहोचलो

शिवाजी पार्क,

प्रत्येकाने इथे अथांग आणि उतुंग व्हावं असं हे ठिकाण.......

मैफिलींचं, गप्पांचं.......

पोस्टात असताना इथे पत्र टाकायचो.... 

पत्रातलं शिवाजी पार्क,

आठवलं, गहीवरलं......


स्वतःच स्वतःला शोधायचं झालं की यावं पार्कात,

पावला पावलावर मातीचा धुरळा बिशाद करु लागतोच,

कणभर, मनभर, देहभर....

आजूबाजूच्या झाडांचं काहीबाही बोलणं चालू असतं म्हणे,

कट्यावर बसलेल्या माणसासारखी बोलतात म्हणे ती....

नाकासमोर चालत सुटावं ते इथेच,

हातातल्या भेळीचा ओला कागद वाचत वाचत.....

इथे,

खुशाल गप्पा ही माराव्यात आणि पावलांवर टप्पा ही गाठावा तो इथेच..... 


थोडं पुढे,

आंबेडकरांचा कोपरा चुकवून,

जलतरण तलावातले गांधींच्या बाजूचे स्मारकातले सावरकर बघतच......       

डोळ्यात भरतो तो महापौर बंगला त्याचा महापूर डोळ्यात घेऊनच,

पुढे चालू लागलो.....

तेवढ्यात,

कोपऱ्यावर पायाला टाच मारून उभे

पेडणेकर म्हणाले,

चाल........

अजून अंतर गाठायचं आहे तुला चालू लाग....

पुन्हा चालू लागलो हातातली मासळी समुद्रात सोडून,

ठरवलं मासळी विकायची नाही आणि,

मुंबईही विकायची नाही....


Rate this content
Log in