STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

3  

Prashant Shinde

Drama

ढेकूण...!

ढेकूण...!

1 min
15.2K


कानावर तंबी ऐकू आली

ढेकणासारखं चिरडीन

अरे बापरे म्हटल किती दिवसांनी

ढेकणाची आठवण झाली.....


वाईट वाटलं, आनंद ही झाला

ते ढेकूण चिरडण्याचे दिवस

त्या गाद्या, त्या वाकळी

आणि त्या ढेकूण मंडित खाटी आठवल्या....


सारं मजेशीर होतं आणि

त्रासदायकही होतं

पण त्या दिवसांनी

रक्त कोणाच पिऊ नये हे शिकवलं....


आपण रक्तपिपासू असू

तर नियतीच आपल्याला चिरडते

हे पक्क त्या वयात कळलं

आणि सदमार्गाकडे मन वळलं...


आज ढेकणाचं जीवन

जगत नाही याचं समाधान वाटतं

आणि म्हणूनच जीवनात

सौख्य ,समाधान हे शांततेत नांदतं.....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama