Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

सृष्टि सिंह

Drama

3  

सृष्टि सिंह

Drama

This is Test from tech

This is Test from tech

2 mins
12.1K


काय एक एक माणसांचे नमुने मुंबईत बघायला मिळालेत.

आयुष्य धन्य पावतंय अगदी.

मगाशी एका चायनीजच्या गाडीवर ऐकलेला संवाद -

(मी तिथे काय करत होतो हा प्रश्न विचारू नये. आजारातून उठून एक दिवस पण झालेला नाहीये, त्यामुळे पुढचा एक महिना तरी नो चायनीज.)


गिऱ्हाईक - एक नुडल्स आणि एक राईस दे.... चिकन हां....


गाडीमालक ( पोऱ्याला) - एक चिकन नुडल और राईस बना रे...


गिऱ्हाईक - थोडा झणझणीत बनव रे राईस... आणि नुडल्स मिडीयम.... पोरांना तिखट चालत नाही माझ्या.... ते पीस जरा जास्त टाक ना बे.... कशाला कंजूसी करतो..? कोबी घाल की जरा अजून... सॉस पण जास्त घाल.


( ****, सकाळी *****तून धुर निघेल, एवढा चिली सॉस घालायला सांगितलास तर... इति मी )


गाडीमालक पैसे मोजत उभा होता... त्याने फक्त बनवणाऱ्या पोराकडे बघितलं... दोघेही एकमेकांकडे बघून सहेतुक हसले....

साहेबांची बडबड चालूच होती.... 


"भाय, थोडा गोबी चटनी दे ना..."


पोरगं - साब, वैसा अब नही मिलता.... एक्स्ट्रा दस रुपया देना पडेगा.....


"दे बे, त्याचे कसले पैसे घेता तुम्ही?"


"सॉरी साब, मालिक ने मना किया है..."


साहेब मालकाला - क्या यार एक प्लेट गोबी चटनी भी नही दे सकते क्या आप?


मालक - नही, दस रूपया दो और एक प्लेट दुंगा। फोकट में नही.....


साहेब - छोड दे फिर... ऑर्डर कॅन्सल... नाय पायजे तुझं चायनीज..... *******, एक प्लेटसाठी एवढा माज? साला समजतो कोण स्वतःला *****, ****** बघ यापुढं गिऱ्हाईक येऊन देतो का तुझ्या गाडीवर...... ***** ...... असं म्हणतं तो तिथून पैसे न देताच निघून गेला.


(तोपर्यंत दोन्हीही गोष्टी बनवून झालेल्या होत्या.)


नशिबाने तिथे आलेल्या दोन नवीन गिऱ्हाईकांनी तीच ऑर्डर केल्यामुळे त्याने बनवलेलं जेवण फुकट गेलं नाही....


ती ऑर्डर त्या लोकांना देऊन पुढच्या गिऱ्हाईकांच्या ऑर्डर घेण्यात मालक आणि ते बनवण्यात तो पोरगा दोघेही परत व्यस्त झाले.

_________________________________


आपण जसं पोटासाठी कष्ट करतो तसाच समोरचा माणूसही त्या एक वीत पोटासाठीच राबत असतो....

हे लक्षात घेऊन त्याच्या कामाला शाबासकी दिली नाही तरी चालेल (त्याचीही तशी अपेक्षा नसते) किमान नावे तरी ठेऊ नयेत.....


महिना 20000 पगार घेणारा माणूस माज तर असा दाखवत होता की जसं काय five star हॉटेलमध्ये त्याला सर्व्हिस मिळाली नाही.....


80 रू. ची नुडल्स खाणार आणि आव असा आणत होता की जणू याने आज तिथून पार्सल घेतलं नाही तर तर ती माणसं उपाशी मरणार होती....


जनाब..... ज्याने चोच दिली तो ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे दाण्याचीही सोय करून ठेवतो....!!


असो......


अशीही असतात माणसं.....


Rate this content
Log in

More marathi poem from सृष्टि सिंह

Similar marathi poem from Drama