STORYMIRROR

Sujit Falke

Drama Inspirational Others

3  

Sujit Falke

Drama Inspirational Others

कमला गेली शाळा मेळाव्याला

कमला गेली शाळा मेळाव्याला

2 mins
149

अग कमला अग कमला

एक काम करशील

उद्या शाळेच्या मेळाव्याला जाशील

शाळेत जाऊन काय करु बाई

घरच काम कोणी करणार नाही ||

तुझ्या बाळ्याचे नाव नोंदशील,

वजन उंची अन वय मोजशील,

विकासपत्र तुझ्या हाताने भरशील,

एक एक क्षमता बाळाच्या पाहशील,

एक एक घटकाला समजून घेशील,

सगळ्या स्टॉलवर माहिती घेशील.........अग कमला ||

यातून काय समजल मला

उमजल का काही या ध्यानाला

बाळ्याचा विकास कळेल तुला ,

शारीरिक विकास कळेल तुला,

बौध्दिक विकास समजेल तुला,

भाषिक विकास उमजेल तुला,

गणन विकास कळेल तुला,

बाकीची कुठे बाळ्या कुठे ,

पप्या कुठे नी बाळ्या कुठे,

पारु कुठे नी बाळ्या कुठे ,

कळेल तुला अन समजेल तुला ...... अग कमला ||

सगळ मला कळाल बाई

बाळ्याचा विकास कसा होइल

मारुदे त्याला दोरीवर उड्या,

भाजीतले बटाटे मोजु दे त्याला,

लहान फुगा अन हा मोठा फुगा ,

लाल लाल टोप्या अन काळ्या टोप्या,

मित्रांशी त्याच्या खेळूदे त्याला ,

गप्पा गोष्टी करु दे त्याला ,

चित्र संख्या मोजुदे त्याला ,

मुळाक्षरे पाहु दे त्याला,

एक एक अंक मोजु दे त्याला...... अग कमला ||

वा वा बाई लई बेस झाल

बाळुच शिक्षण सुरु झाल

पहा हुशार झाला तुझा बाळ्या,

वर्गात आता अव्वल आला ,

पाहिलीत तो रमुन गेला,

मेळाव्याचा इलाज कामाला आला,

गुरुजीचाही उर भरुन आला ,

प्रथम कायास फळाला आला ,

शिक्षणक्षतीचा नायनाट केला,

कोविड पिढ्यांचा पहा उद्धार झाला ...... अग कमला ||

शिक्षणगंगा समजली तुला,

भगिरथ गुरुजी तो पुण्यात्मा

गावच भल कळत त्यांना,

शाळेच हित कळत त्यांना,

समाजाच भल कळत त्यांना,

मुलांच हित कळत त्यांना,

म्हणूनच मुल धाडा शाळेला ,

शिक्षणाने येइल अर्थ जिवनाला ...... अग कमला ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama