STORYMIRROR

THEWRITER VIKRANT

Romance Action

3  

THEWRITER VIKRANT

Romance Action

नजर पावसाळी (गझल)

नजर पावसाळी (गझल)

1 min
177

पडली नजर कुणावर, भर पावसात माझी.

भिडली तिच्या रुपावर, भर पावसात माझी.


सांगू कसे तिला हे, बेधुंद पावसा मी

आहे नजर तुझ्यावर, भर पावसात माझी.


ओठांवरी तिच्या त्या, सजले गुलाब लाली

ही गझल पाकळ्यांवर, भर पावसात माझी.


सोडून दे जुळा, तो कर केस मोकळे तू

आहे नजर जुळ्यावर भर पावसात माझी.

 

खोडू नको फळा तो, वन फोर थ्री लिहूनी,

आहे नजर फळ्यावर, भर पावसात माझी.


शेतीतला विळा तो, दुष्काळ पाहताना,

आहे नजर विळ्यावर, भर पावसात माझी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance