पांडूरंगाचा अभंग
पांडूरंगाचा अभंग
आषाढी कार्तिक/पंढरीची वारी
सोहळा तो भारी / पंढरीला//१//
मृदंग,चिपळ्या,नाचे वारकरी
नाम घेई हरी/ भक्तगण//२//
नामात तल्लीन /भक्तीमध्ये दंग
आनंदाचे रंग/ उधळती//३//
तुळशीची माळ/कपाळी चंदन
विठ्ठला वंदन/ मनोभावे//४//
पांडुरंग हरी/कृपेची सावली
भक्तांसी पावली/ सर्वकाळ//५//
चंद्रभागा तीरी/वारीचा सोहळा
वारकरी लळा / लावितसे//६//
उघडावे दार / भेटीस व्याकुळ
सावळ्या बकुळ/ वाहतसे//७//
