मकर संक्रांत...!
मकर संक्रांत...!
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
वाक्याचा पुरता चोथा केला
जणू वाक्यानेच या देशाला
आनुवंशिकतेचा मधुमेह झाला
आता नवा विचार नवा आचार
नवा विकल्प नवा संकल्प
सार कस नवं नवं आणि हवं हवं
तरी पण गड्या जून ते सोन हेच खरं
तिळगुळ घे गोड गोड बोल
आचार विचारांचा घालू नंतर घोळ
नाही लागणार कोणताच टोल
रूढी परंपरा नसतात फोल
तिळाचे तेल कापसाची वात
गुळ पोळीची सुंदर नुसती बात
मकर संक्रांतीच्या गोड वड्या खात
घेऊ आता मैत्रीचे आपण हातात हात....!!!!
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
