STORYMIRROR

Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

आई

आई

1 min
178

वेदनेत विव्हळता

वदनी वसते आई

आनंदाची परिभाषा

कवेत घेणारी आई


बाल-हट्ट पुरवण्या

हक्काचा पदर आई

मन मोकळे करण्या

मायेची तिजोरी आई


भूक भागण्या तृप्तीची

अन्नपूर्णा दान आई

स्वर्ग सामावे चरणी

अतुल्य वात्सल्य आई


सुख दुःखाचे निःशब्द

भाषित पाझर आई

शांतीचे धाम कुशीत

अनादी ममता आई



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics