STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Classics

3  

Sumit Sandeep Bari

Classics

पेपर संपले रे...

पेपर संपले रे...

1 min
160

आज भरपूर दिवसांनी

आनंदी झाले माझे मन,

कारण आज संपला

परीक्षेचा हा सण.


परीक्षा काळात होता

अभ्यास आणि अभ्यास,

आज परीक्षा संपली

घेतला मी मोकळा श्वास.


वर्षभरातील अभ्यासाचा

इथे मी कस लाविला,

प्रामाणिकपणे पेपर लिहून

वेगळाच आनंद मिळविला.


आज अखेर माझे सर्व पेपर संपले,

आनंदाने मन माझे फुलासारखे डोलू लागले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics