अंतरीचे स्पंदन
अंतरीचे स्पंदन
काळोख्या रजनीत सखया चंद्र होवुनी येशील का ?
शांत शीतल चांदणे मजला तू देशील का ?!!
हरवलेल्या मम मनाचा शोध घेण्या येशील का ?
गुदमरलेल्या या जिवाला श्वास देण्या येशील का ?!!
अधीर या कानांना सूर सुमधुर देशील का ?
परत येवुनी साथीला संसारगीत गाशील का ?!!
चित्र मनातील साकाराया चित्रकार होशील का ?
रेखाटलेल्या चित्रात रंग प्रितीचा भरशील का ?!!
स्वप्नाळलेल्या लोचनी वास्तव रुप देशील का ?
हितगुज करण्या मजशी रे मृगजळ सोडुनी येशील का ?!!
विकसीत सुमने बागेतली डोळे भरून पाहशील का ?
अंतरिची उणीव भरण्या बागेचा माळी होशील का ?!!
सारं सारं सुख पाहून मोदभरीत होशील का?
कळत नकळत नीत माझ्या ' अंतरिचे स्पंदन ' होशील का ?!!

