एकटं...!
एकटं...!
कधी कधी
एकटं एकटं वाटत
जेंव्हा आपल्या
बरोबर कोणीच नसतं ...
मी ला घेऊन
जीवन जगावं लागतं
मी ला विसरण्याचं
धाडस करावं लागतं...
तेंव्हा वर आकाशात
उंच उंच उडणारा गरुड दिसतो
त्याच्या धाडसाचं
मोठ्ठ कुतूहल वाटतं...
साऱ्या गगनाला
गवसणी घालण्याची उमेद
त्याच्या पंखात कोठून येते
याच हीं मोठ्ठ कौतुक वाटत...
तेंव्हा सभोवार फिरणारा
पक्षांचा थवा नजरेस पडतो
आणि न्यूनतेच गमक
सहजच मला कळतं....
एकटे पणाच भय कधी
बाळगायच नसत हे उमजत
गरुडाला देखील लाजवेल
अशी भरारी माझं मन मग घेतं.....!
