बाबा
बाबा
बाबा कष्टाचा डोंगर
धडे नियती जागर
माय आजारी सांभाळी
धरे संसार नागर
कर्म कर्तव्य ओळख
गणगोत विसरत
भोगे बालपणी कष्ट
वाट मुंबई धरत
उभा साऱ्यांच्या छप्पर
देत शिक्षण पहाट
पायपीट काटझाट
ओढे कष्टाचे रहाट
भावा बहिणींंच्या लग्ना
कर्ज बाजारी जुगाड
देत नोकरी आधार
स्नेहवेल जीवापाड
चक्रव्यूह कस्तुरीचा
शीत असता जागृती
नाही मनी ठेवे खन्त
देह चंदनी आहुती
