STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

गुलमोहर...!

गुलमोहर...!

1 min
204

वसंत येता

गुलमोहर फुलतो

आनंद जीवनी

तयास पाहून ओसंडतो

लाल केसरी

उधळण मनोहर रंगाची

किमया सारी

तुझी देवा कायमची

त्यात पाहता मी तुला

अंग सारे शहारते

कधी नव्हे ती माया पाहून

काया सारी मोहरते

अशीच जीवनी

आनंदाची उधळण

देवा तव कृपेने

सदैव आमच्या होउदे

तुझ्या सानिध्यात देवा

वसंत जीवनात आमच्या

सदैव विविध रंगांनी

अखंडित फुलून राहू दे......!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics