सावळा विठ्ठल
सावळा विठ्ठल
कर कटावरी घेऊन
उभा विटेवरी
शामल वर्ण
तेजस कांती
डोळ्यात दाटली माया
माझा तो विठू सावळा
गळा वैजयंती माळा
भक्तांचा तो लाडका
वामांगी उभी रखुमाई
एकादशीला असे पंढरपुरी
संतांचा मेळा
माझा तो विठू सावळा
तू श्रीहरी,तू पांडुरंग
नावे तुझी अनेक, पण तू एकच
उभा अठ्ठावीस युगे, विटेवर
भक्तांच्या हाकेला साद देतोस
पंढरपुरी दाटला भक्तांचा मेळा
माझा तो विठू सावळा
